Uncategorized

बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने प्रो डॉ अनिल काळबांडे सन्मानित

( श्रीलंका येथे दिमाखदार सोहळ्यात सन्मान )

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड – तालुक्यातील मिलिंद महाविद्यालय मुळावा चे मराठी विभाग प्रमुख तथा जगविख्यात साहित्यिक, प्रबोधनकार प्रो .डॉ . अनिल काळबांडे यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक व साहित्य विषयी योगदानाची दखल त्यांना नुकताच डॉॅ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने दिनांक 17 व 18 मे रोजी श्रीलंका येथील कोलंबो शहरात पार पडलेल्या पाचवे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन पार पडली. त्यात त्यांना हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला . याही अगोदर त्यांना बँकॉक मलेशिया , दुबई ही साहित्य संमेलनात डॉ . बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते .
या सत्कार सोहळ्याला श्रीलंकेची सरकारचे मुख्य सचिव के एम जयतूंगा यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक डॉ. विद्याधर बनसोड स्वागतअध्यक्ष प्रख्यात कथाकार प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील , जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचे अध्यक्ष डॉ . दीपककुमार खोब्रागडे, उपाध्यक्ष डॉ . विलास तायडे विधीतज्ञ अॅड भूपेश पाटील , ज्येष्ठ समीक्षक डॉ . अशोक इंगळे यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . सुरुवातीलाच श्रीलंका येथील भिक्षूंच्या उपस्थितीत त्रिशरण पंचशील व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून या सत्कार सोहळ्याची सुरुवात करण्यात आली .
यावेळी बोलताना महामंडळाचे अध्यक्ष डॉ . दीपक कुमार खोब्रागडे यांनी , डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार संपूर्ण विश्वात त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याची या संमेलन आयोजना मागची भूमीका असल्याचे प्रतिपादन केले . या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. रेहना बेग यांनी तर प्रास्ताविक अँड भुपेश पाटील तर आभार सुधीर वानखेडे यांनी मानले . डॉ . काळबांडे यांच्या या पुरस्काराने औदुंबर नगरीच्या वैभवात भर पडल्याने त्यांचे प्रख्यात जेष्ठ साहित्यिक प्रा . रविचंद्र हडसनकर , प्रख्यात ग्रामीण साहित्यिक डॉ . जगदीश कदम यांच्यासह प्रा . ज्योती खंदारे ‘ डॉ . प्रदीप इंगोले यासह दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल माने , महात्मा फुले पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तराव काळे पत्रकार संतोष मुडे, वीरेंद्र ताजवे , बाळासाहेब ओझलवार , अविनाश खंदारे ‘ अरुण बेले ,नीलकंठ धोवे , राजाभाऊ गांजेगावकर , साहेबराव धात्रक , गजानन भारती, अझरुला खान, भीमराव नगरे, शाहरूख पठाण , स्वप्नील मगरे, संजय देशमुख , संभाजी भोयर सह मित्रमंडळीने अभिनंदन केले .
(सोबत डॉ काळबांडे यांना सन्मान प्रदान करतानाचा फोटो )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!