Uncategorized

साई श्रद्धा नगर मध्ये सुविधाचा अभावउमरखेड नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन

शेख मुजाहिद

ससंपादक मो.7798306192

उमरखेड शहरातील साई श्रद्धा नगर मध्ये अनेक समस्याने साई श्रद्धा नगर वाशी झाले त्रस्त नागरिकाचे आरोग्य आले धोक्यात उमरखेड नगरपरिषदे चा कोणता सफाई कामगार नाली साफ करण्यासाठी येतच नाही. व कोणताही अधिकारी त्यांना पाठवण्याची तसदी घेत नाही. नाल्याच्या पाण्याला दुर्गंधी सुटत असून त्यापासून होणाऱ्या डासाचा व वासामुळे घरात राहणे कठीण झाले आहे . रोडवर लावलेले पथदिवे फक्त शोभेच्या वस्तू झाल्या आजूबाजूला शेती असल्यामुळे रोडवर विषारी जीव जंतू वावरत असतात. संध्याकाळ झाली की रोडवर येणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखेच आहे. अशा अनेक समस्येचे वेळाखयात साई श्रद्धा नगर वाशी अडकले आहेत. त्याबाबत समस्येचे निवारण करण्यासाठी मुख्याधिकारी नगरपालिका यांना आज निवेदनातून मागणी केली आहे. यावेळेस उत्तम ग्यांनबा काळे, विशाल गजानन नंदनवार, शैलेश लक्ष्मण शिंदे, पांडुरंग इंगळे, प्रेम काळे, सुरेश पुरमे इत्यादी नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!