उमरखेड मध्ये प्रहार कार्यकर्ते आक्रमक बच्चुभाऊ कडू यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने शासनाची तिरडी काढत केले पिंडदान आंदोलन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड :- माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी शेतकरी कर्जमाफी सह संबंधित १७ मागण्यांसाठी मोझरी येथे सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उमरखेड येथे उमरखेड शहर प्रमुख राहुल मोहितवार व अभिजीत गंधेवार यांचा नेतृत्वात सरकार विरोधात रोष व्यक्त करत सरकारची अंत्ययात्रा काढून सरकारचे पिंडदान आंदोलन करत समर्थन केले. शासन प्रशासनाच्या निर्लज्य कारभारामुळे दुर्लक्षितपणामुळे जणू काय सरकार मेलय यादृष्टीतून सरकार उपोषणाची दखल अद्यापही घेत नाही

किंवा शासनाचा कुठलाही प्रतिनिधी मंडपात येऊन भेट देत नाही. या मेलेल्या सरकारची तिरडी काढत त्यांचे आज पिंडदान सुद्धा प्रहार कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. मोझरी येथे सुरू असलेल्या बच्चूभाऊ कडू यांच्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला समर्थन जाहीर केले. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी. दिव्यांग व विधवा महिलांना ६००० रुपये मानधन. हमीभावावर २०% अनुदान. ०७ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीतील इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावे. तरुणांच्या हाताला काम व योग्य दाम देण्यात यावे. रोजगार भरती करण्यात यावी. शेतकऱ्याप्रमाणे शेतमजुरांना सुद्धा आर्थिक सहाय्य देण्यात यावे. शेतमजुरांकरीता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे. शहराप्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा घरकुलाला ५ लाख अनुदान देण्यात यावे. मेंढपाळ, मच्छीमार , ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या अशा एकूण १७ मागण्यांचे समर्थन करण्याकरिता उमरखेड येथे शहर प्रमुख राहुल मोहितवार व अभिजित गंधेवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
ही अंत्ययात्रा संजय गांधी चौक उमरखेड येथील निघून उपविभागीय कार्यालय उमरखेड या ठिकाणी येऊन थांबत ठिकाणी पिंड दान करण्यात आले,