Uncategorized

हिमायतनगर पोलीस प्रशासन रात्री 10 ला करते दुकाने बंद,अण डीजे वाजते रात्री 2 चते 3 वाजे पर्यंत

हिमायतनगर प्रतिनिधी ( अजिम हिंन्दुस्तानी )

हिमायतनगर पोलिस प्रशासन हे रात्रीच्या 10 वाजेच्या अचार सांहितेचा
दुकानदारांसाठी पालन करतात, हिमायतनगर शहरातील सर्व होटेल्स, कापड़ ,,दूकान असो की, चहा टपरी, दररोज रात्री चे 10 वाजले की हिमायतनगर पोलीस प्रशासनची गाडी निघते, व सर्व दूकानदारांना, दुकाने बंद करण्यास अव्हान करतात, रात्री 10 वाजेच्या नंतर 1 मिनट हि वरे झाला की त्या दुकानदारांवर सक्तीने नियमाचे पालन करतात,

परंतु डीजे ला बंदी असतांना सुद्धा लग्नसराई वेळी कुणाच्या घरी लग्न असला की त्याघरच्यानीं डीजे लावतात,
आणि 40 डिसेबल च्या वरे 50 ते 60 डिसेबल आवाज सोडून इतर नागरिकांना रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत त्रास देतात, त्यावर कोणी ऑब्जेक्शन घेत नाही, तर त्याला त्रास होत नाही असे हिमायतनगर पोलिसांनी समजावे का??

आणि जे लोक डीजे मुळे त्रास होत असल्याची तक्रार करतात, तर त्याची अमल बजवानी न करता हिमायतनगर पोलिस प्रशासन ठाण्यातच बसून नंतर येतो म्हणुन सांगून पळ काढतात,,

आणि जोरात मोठ्या अवाजाने रात्री 2 वाजेपर्यन्त डीजे चालू असला तरी त्याला हिमायतनगर पोलिसांकडून सूट दिली जाते,

अश्याच प्रकारे आज दिनांक:- 8/6/2025 रोजी सुद्धा रात्रीचे 1 वाजे पर्यंत हिमायतनगर पोलिस स्टेशन हद्दित, पोलिस स्टेशन च्या बाजूला अवघ्या 20 मीटर च्या अंतरावर मोठ्या आवाजात डीजे वाजत असतांना त्याची वारंवार सुचना देऊन हि हिमायतनगर पोलिस प्रशासनाने जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले, व तसेच रात्री 1 वाजता डीजे चा आवाज़ मोठा असतांना सुद्धा हिमायतनगर पोलिसांनी डीजे वाजवीणाऱ्यावर कार्यवाही न करता मूकदर्शन बनून डीजे चा आवाज ऐकत ऐकत, परत पोलिस स्टेशन ला निघुन जातात सदरची तक्रार वरिष्टानां करण्यात येणार आहे,
ज्या दूकानदारांचे दुकानामुळे वायलेंस होत नाही ते रात्री 10 वाजेच्या नंतर बंद केले जाते, आणि ज्याचे वायलेंस होते नागरिकांना त्रास होते त्यावर हिमायतनगर पोलिस प्रशासन जानिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची माहिती मिळत आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!