Uncategorized

३६ वर्षांनी साकळे विद्यालयाचे वर्गमित्र एकत्र १९८९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहमिलन उत्साहात संपन्न


शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192


उमरखेड : – साकळे विद्यालय, उमरखेडच्या दहावी इयत्तेतील १९८९ च्या बॅचचे वर्गमित्र तब्बल ३६ वर्षांनी एकत्र जमले. या स्नेहमिलनाने जुन्या आठवणींना उजाळा मिळवून दिला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात धमाल मस्ती करत, पारंपरिक जुने खेळ खेळून, गाणी गात आणि मनोगते व्यक्त करत आपली भावना व्यक्त केली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल व आदरणीय गुरुजनां बद्दल कृतज्ञता व्यक्त करत सिलिंग फॅन्स भेट स्वरूपात दिले व ते वर्गात बसवले गेले. विविध क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण करणारे जवळपास ४५ मित्र व १५ मैत्रिणी या स्नेहमिलनाला उपस्थित होते.
सामान्यत सामान्य विद्यार्थ्यांना सबल व चारित्र्यवान ही शाळा कशी घडवते असे प्रतिपादन प्रत्येकाच्या तोंडी होते

कार्यक्रमात त्यांच्या शाळेतील शिक्षक श्री अंबादास साकळे,श्री अनंत पांडे, श्री भारत कुलकर्णी, श्री प्रसाद पेन्टेवाड, आणि श्री चौधरी ,सर यांची विशेष उपस्थिती लाभली. शाळेचे मुख्याध्यापक गणेश पानबुडे सर आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन केले.
शहरातील नामवंत बालरोगतज्ज्ञ डॉ. संदेश देशमुख, जयेश पानसुरिया,श्याम शुक्ला ,गजानन लांडगे, प्रशांत उल्लंगवार, विरभद्रे पत्रे, ऍड मृणाल शेष (संस्थानिक) नागपुर, मीना जवादे मूर्तीजापूर, लक्ष्मण नांदे, किसन धुळे व इतर मित्रांचा सहभाग होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!