देवराव पुसदकरांनी वयाच्या ८५ व्या वर्षी वॉकथॉन स्पर्धेत घेतला सहभागउत्तम आरोग्य हीच संपदा

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
दिनांक २३/०२/२०२५
रोटरी क्लब ऑफ उमरखेड चे वतीने आरोग्य हीच संपदा हेच ध्येय ठेवून वयाचे ६० वर्षाचे वरील ज्येष्ठ नागरिकांकरिता वॉकथॉन-२०२५ चालण्याचे स्पर्धेचे आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजन करण्यात आले होते.
सदर वाकथॉन स्पर्धेमध्ये उमरखेड शहरासह तालुक्यातील मनाने तरुण असलेल्याअसंख्य ज्येष्ठ नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला. या स्पर्धकांपैकी एका स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते स्पर्धक म्हणजे देवराव नागोबा पुसदकर वय ८५वर्षे सर्वजण त्यांना बापू म्हणूनच संबोधतात. सकाळी लवकर उठणे स्नान इत्यादी आटोपून देवदर्शन वेळेवर जेवण तसेच धार्मिक ग्रंथाचे वाचन आणि ते ही चष्मा न लावता असा बापूंचा दैनंदिन नित्यक्रम बापूंची शरीरयष्टी काटक असून ते मनाने सदैव तरुणाईचा भाव ठेवूनच आजही स्वावलंबी जीवन व्यतीत करत आहेत. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले यावेळी वयाने जरी वृद्ध असलो तरी मनाने आजही तरुण आहोत हेच स्पर्धकांनी दाखवून दिले. प्रत्येक स्पर्धकांच्या चेहऱ्यावर आनंदाची तरुणाईची झलक बघायला मिळाली.