वक्फ सुधारणा विधेयक २०२५ चा तीव्र निषेध – मुरूम येथे मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचे धरणे आंदोलन

इम्रान सय्यद
मुरूम शहर प्रतिनिधी
मुरूम,केंद्र सरकारने नुकतेच संमत केलेल्या वक्फ सुधारणा विधेयक २०२५ विरोधात मुरूम शहरातील अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांनी दि ११ एप्रिल शुक्रवार रोजी सकाळी १० च्या सुमारे तीव्र आंदोलन केले. या विधेयकाच्या निषेधार्थ शहरातील मुस्लिम बांधवांनी मुरुम पोलीस ठाण्याच्या समोर धरणे आंदोलन करून मुरूम पोलिस ठाण्याचे सहायक संदीप दहिफळे यांच्यामार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले.सदर विधेयक मुस्लीम समाजाच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे असून, संविधानातील कलम १४, १५, २५, २६ आणि २९ नुसार दिलेले धार्मिक स्वातंत्र्य व अल्पसंख्याक अधिकार धोक्यात येणार असल्याची गंभीर चिंता

आंदोलकांनी व्यक्त केली.देशभरात सुमारे ९ लाख एकर वक्फ मालमत्ता असून, ती मुस्लिम समाजाने समाजहितासाठी दान केलेली आहे. नव्या विधेयकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना वक्फ मालमत्तेवर सर्वस्वी अधिकार, वक्फ बोर्डात गैरमुस्लिम सदस्यांची नियुक्ती, वक्फ न्यायाधिकरणाचे अधिकार कमी करणे, आणि वक्फ मालमत्तेवरील सर्वे बंद करणे यासारख्या तरतुदी करून ही मालमत्ता खाजगी उद्योगपती व संस्थांकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला.या धरणे आंदोलनास मुरूम शहरातील व

आलुर केसर जवळगा दाळीब कोथळी असे अनेक गावांतील या आंदोलनात सहभाग होते यावेळी मौलाना शौकत, मौलाना अब्बास, हाफिज अब्दुल , हाफिज सलीम, हाफीज निजाम बाबा कुरेशी, इकबाल चौधरी, सरफराज काजी, इलियास पीरजादे, सलीम अत्तार , अय्युब मासुलदार, राजू मुल्ला, अय्युब जवळगे, रफिक येणेगुरे, अय्युब इनामदार, युसुफ मुल्ला, अब्बास मुल्ला, जमीर इनामदार, शाहिद येणेगुरे यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते