Uncategorized

पोलीस स्टेशन हद्दीतील मटका, जुगारासह अवैध धंदे बंद करण्याची मागणी

उमरखेड एसडीपीओ कार्यालयासमोर शामभाऊ धुळे यांचा उपोषण

मुख्य संपादक

उमरखेड गत अनेक दिवसांपासून उमरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध व्यवसाय सुरू आहे. यामुळे कौटुंबिक वाद घराघरात निर्माण होत असल्याने कलहाचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी जिल्हा पोलीस अधीक्षक व स्थानिक एसडीपीओंनी अवैध धंदे पूर्णतः बंद करावे, या मागणीला घेऊन २४ मार्चपासून एसडीपीओ कार्यालयासमोर १ उपोषणकर्त्यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
उमरखेड येथील ठाणेदार शंकर पांचाळ हे ठाणेदार म्हणून रूजू झाल्यापासून शहरात अवैध मटका, जुगार, गांजा ,रेती,गुटखा गोनखनिज,व गावठी दारू विनापरवाना देशी दारु हा व्यवसाय सर्वत्र सुरु आहे. अवैध धंदे चालकाविरुद्ध कारवाईची धडक मोहिम राबविण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. शहरासह ग्रामीण भागातील ४८ ठिकाणी मटका काउंटर असून राजरोसपणे सुरु असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. अनेक गावात गुटखा, जुगार व अवैध दारू गांजा व रेती गान खनिज विक्रीला उधान आल्याचे तक्रारीत नमूद आहे. खुले आम सुरु असलेल्या अवैद्य धंद्याच्या विळख्यात शाळकरी मुलेही अडकत असल्याचे


दिसून येत आहे. त्यामुळे अवैध धद्याच्या व्यसनाधिन जाऊन युवा पिढीचे जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हा सर्व प्रकार रोजच उमरखेड पोलिसांना दिसत असूनही याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत शामभाऊ धुळे , यांनी एसडीपीओ यांच्या कार्यालयासमोर उपोषणास प्रारंभ केला आहे. त्यामुळे अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्या संबधित पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणावरून इतरत्र ठिकाणी बदली करण्यात यावी, अशी मागणीही उपोषणकर्त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!