Uncategorized

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी घेतला टपाली मतदान अधिकारी‌ – कर्मचारी आढावा

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192
उमरखेड, दि 30सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी तहसील कार्यालयातील सभागृहात टपाली मतदान अधिकारी व कर्मचा-यांचा आढावा घेतला.
यावेळी नायब तहसीलदार वैभव पवार, नायब तहसीलदार कावरे उपस्थित होते. 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, शांततेत व पारदर्शकपणे पार पाडावी, यासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांनी कर्तव्यात कसूर न ठेवता दक्ष राहण्याचे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांनी केले. 15- हिंगोली लोकसभा मतदार संघात 82-उमरखेड विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहे. उमरखेड तहसील कार्यालय येथील सभागृहामध्ये टपाली मतदानाशी संबंधितांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. निवडणूक आयोगाने आवश्यक गोष्टीची पूर्ण पूर्तता करण्यास अधिन राहून टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष मतदार, सेनादलातील मतदार निवडणुकीचे काम करणारे मतदार प्रतिबंधात्मक स्थानबध्दतेत असलेले मतदार अनुपस्थित मतदार वरिष्ठ नागरिक, दिव्यांग, अत्यावश्यक सेवेतील मतदारांचा‌ समावेश होतो.


निवडणुकीचे काम करणा-या मतदारासाठी टपाली मतदान
निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी-कर्मचारी निवडणूक कामात आवश्यक असणारे मदत करणारे अशासकीय कामगार तसेच बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस अधिकारी-कर्मचारी, होमगार्डंना टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर कर्मचारी नेमणूक स्वतःचे विधानसभा मतदार संघात झालेली असल्यास निवडणूक कार्य प्रमाणपत्राव्दारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कर्मचारी नेमणूक मतदार संघाबाहेर झाल्यास टपाली मतदान आधारे मतदान करण्याची सुविधा असेल.
इडीसी व टपाली मतदानासाठी अर्ज सादर करणे
टपाली मतदानसाठी नमुना फाॅर्म 12 नमुना फाॅर्म 12 A विहित कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांचाकडे सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत विधानसभा मतदारसंघ क्रमांक मतदार यादी भाग क्रमांक मतदार यादीतील क्रमांक तसेच नेमणूक आदेश क्रमांक दोन प्रति, निवडणूक ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील अर्ज सादर करणे तसेच अर्जात काही दुरुस्ती असल्यास ती पूर्ण करणे प्रतिक्रिया उमेदवारी माघार घेण्याच्या दिनांकापूर्वी पूर्ण होणे आवश्यक राहील.
मतदानासाठी सुविधा केंद्र
प्रत्येक प्रशिक्षणाच्या ठिकाणी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालया ठिकाणी टपाली मतदानासाठी सुविधा केंद्र उभारण्यात येईल उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी यांना सुविधा केंद्र ठिकाणी उपस्थित राहून प्रक्रिया पाहू शकतात. प्रत्येक प्रशिक्षण सत्रात किमान 2 तास किंवा प्रशिक्षणानंतर व्यवस्था होऊ शकते. 2 तासापेक्षा अधिक कालावधी दिला जाऊ शकतो.
निवडणुकीचे काम करणाऱ्या मतदारासाठी टपाली मतदान
टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम नमुना 13 A मधील घोषणापत्र भरून त्यावर स्वाक्षरी करावी. उपस्थित राजपत्रित अधिकारी मतदाराचे ओळखपत्र तसेच टपालीमधील पत्रिका क्रमांक नमुना 13A मध्ये नोंदविला आहे, याची खात्री करून घोषणापत्र साक्षांकित करतील. मतदार हा मतदान कक्षात जाऊन नमुना 13 B च्या आतील लिफाफ्यावर मतपत्रिका क्रमांक नमूद करेल व आपल्या पसंतीच्या उमेदवार समोर खूण (MARK) मार्क करून गोपनीयरीत्या मतदान करतील.
मतदान केलेली मतपत्रिका नमुना 13 B यातील लिफाफ्यावर टाकून सीलबंद करा नमुना 13A मधील घोषणापत्र व मतपत्रिका असलेल्या नमुना 13 B हे दोघांना मोठा लिफाफा नमुना 13 C मध्ये ठेवून बाहेरील लिफाफा सील बंद करावा नमुना 13 C लिफाफा सुविधा केंद्रावरील पेटीत टाकावा लागतो, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!