Uncategorized

भगवान बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती महोत्सव आयोजित

समाज प्रबोधन व विध्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड :- जननायक क्रांतीसुर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमित्त समाज प्रबोधन व विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती महोत्सव समिती उमरखेड द्वारा दिनाक ०३ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात उमरखेड येथे आयोजित केले आहे.


सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश शिकारे (माजी गटशिक्षणाधिकारी),कार्यक्रमाचे उद्घाटक उत्तमराव इंगळे साहेब ( माजी आमदार उमरखेड – महागाव विधानसभा) ,प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.राजेश धनजकर सर (परभणी),लक्ष्मणराव कुरुडे साहेब (सहायक लेखाधिकारी) हे असणार असून प्रमुख अतिथी म्हणून प्रदीप पाडवी साहेब (उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड),सुदर्शन पांडे (वनपरिक्षेत्र अधिकारी उमरखेड),भारत खेलबांडे(सहायक वनसंरक्षक),भास्कर नैताम( सहायक अभियंता एम.एस.ई.बी),गजानन गायकवाड(सहायक अभियंता जलसंपदा),डॉ.चंद्रकांत रिठे(वैद्यकीय अधिकारी),डॉ.नामदेव सरकुंडे(वैद्यकीय अधिकारी ),किसनराव भिसे(सेवानिवृत्त वनपाल),उत्तमराव पांडे(सेवानिवृत्त नायब तहसिलदार),भाऊराव जुंडे(से.नी.वनपरिक्षेत्र अधिकारी),कुलदीप रिठे(वजन मापे निरीक्षक) हे राहणार आहेत.


सदर कार्यक्रमामध्ये वर्ग १० वी व १२ वी उतीर्न गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेत प्रवेश पात्र विध्यार्थी सत्कार,एमपीएससी मार्फत निवड झालेल्या गुणवंतांचा सत्कार,सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन व समाज प्रबोधन करण्यात येणार असून सदर कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने आदिवासीं समाज बांधव व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन क्रांतिसूर्य बिरसा मुंडा सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष फाकिरराव धनवे,कार्याध्यक्ष विठ्ठल पोटे,सचिव सुदाम शिरडे,उपाध्यक्ष शंतिदास खोकले,बापूराव चिरंगे,बाबुराव किरवले मार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!