जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड घराशेजारी राहणाऱ्या युवकाने घरावर दगडफेक केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. यामध्ये जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
शेख सलमान शेख शब्बीर (३२) असे मृत तरुणाचे नाव आहे. मृतक शेख सलमान याच्या घरावर शहरातील तातारशहा वॉर्डात दुपारी दोन वाजताच्या सुमारास गुड्डू ऊर्फ शेख मुफीद शेख मुजाहिन याने दगडफेक केली. दरम्यान दगडफेक का केली याचा जाब विचारण्यासाठी सलमान गेला. यावेळी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये युवक बेशुद्ध झाला. त्यानंतर सलमानला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी उमरखेड उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री १२ वाजताच्या
सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत मृतकाची पत्नी नगमाबी शेख सलमान हिने पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात एपीआय निलेश सरदार करीत आहेत.