Uncategorized

कोरटा येथील खून प्रकरणात तिघांना अटक

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- पन्नास रुपये उधारीच्या वादात तिघांनी तरुणाला मारहाण करून जमिनीवर आपटले. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. कोरटा येथे शनिवारी घडलेल्या खूनप्रकरणात दराटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे.
दत्ता चिंतामण बरगे (३२, रा. दराटी) असे मृताचे नाव आहे. श्रीराम लक्ष्मण उर्फ गोदाजी तोरकड (२३), माधव मारोती तोरकड (३५), लक्ष्मण उर्फ गोदाजी महादू तोरकड (७७), सर्व
रा. कोरटा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दत्ता याचा मित्र असलेला माधव तोरकड याच्यासोबत ५० रुपयांच्या देण्या-घेण्यावरून वाद झाला. यातून तिघांनी बेदम मारहाण करून जमिनीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी किनवटवरून आदिलाबादला नेत असताना मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरुणाची बहीण कमल बंडू शिरडे यांनी दराटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून तिघांविरुद्ध कलम १०३ (१), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!