हिमायतनगर नगर पंचायत प्रशासका चे आम जनतेच्या प्रश्नावर सतत दुर्लक्ष,

कचरा न उचलताच बारकोड ची होत आहे स्कैनिंग,
शहरात अनेक ठिकाणी पथ दिवे बंद तर, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य,
हिमायतनगर नगर पंचायत चे प्रशासक काळापासून, हिमायतनगर शहरातील आम जनतेच्या प्रश्नावर नेहमी दुर्लक्ष करीत आहे,
सविस्तर असे की, हिमायतनगर शहरात नगर पंचायत च्या लोकप्रतिनिधि चे कार्यकाळ संपल्या नंतर, प्रशासक लागू झाले हिमायतनगर शहरात लोकप्रतिनिधि नसल्याने जनतेचे अनेक प्रश्न वाऱ्यावर दिसत असून, काही ठिकानाचे नागरिक तक्रार करूशकत नाहो तर अनेक ठिकानाच्या तक्रारीवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे,

शहरातील अनेक वर्डात पथ दिवे बंद असल्यामुळे पावसाळा जवळ येत असतांना नागरिकांना अंधाऱ्यात ये जा करावे लागत आहे,
सफाई कामगार हे अनेक ठिकाणी कचरा उचलत नाही, याचे तक्रारी नगर पंचायत ला गेला असता नगर पंचायत ने शहरात बारकोड ची सुविधा केली कचरा उचलून त्या ठिकानाचे बारकोड स्कैन करण्याचे काम सफाई कामगारांना दिले तरी हि नगर पंचायत अंतर्गत सफाई कामगार हे एका ठिकानाचे कचरा उचलून चार ठिकानाचे बारकोड स्केन करीत असल्याचे दिसून आले आहे, यामुळे शहरात जगोजागी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे,

ज्यामुळे नागरिकांच्या अरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता ये नाही,
पाणी पुरावठ्याचे काम करण्याची कालावधी 6 महिण्याची करण्याची असतांना सुद्धा चार वर्ष उलतून गेले तरी नागरियाकांना पाणी मिळाले नाही,

शहरात पाईपलाइन चे काम चालू असून सुद्धा नगर पंचायत कार्यालयाने सीसी रस्ते बंधाकाम साठी जिल्हा स्तरावर प्रस्ताव सादर करुन प्रशासकीय मान्यता मिळून दिली, बास्तविक पाहता नळ जोडनी करने बाकी आहे,
पुन्हा बांधलेले नविन रस्ते तोड़ून नळ चे कनेक्शन देण्याची पड़ी आली, त्याचे नाहक त्रास आम जनतेला होत आहे,
या कडे हिमायतनगर नगर पंचायत ने लक्ष देऊन नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याची अत्यंत गरज आहे,,,,
