Uncategorized

गंभीर गुन्हयातील फरार आरोपीस ताब्यात घेवुन केले घातक शस्त्र हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

दिनांक २१ डिंसेबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पोलीस ठाणे उमरखेड हद्दीत गुन्हेगार शोध व अवैध धंदयाविरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलींग करीत असतांना सायंकाळ सुमारास पथकास गोपणीय माहिती प्राप्त झाली को, पोलीस ठाणे उमरखेड अपराध क्रमांक ५९८/२०२३ कलम ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.द.वि. गुन्हयातील फरार आरोपी शेख हुसेन उर्फ शारुख शेख फतरु हा सार्वजनीक शांतता भंग करण्याच्या व हस्तक्षेपीय गुन्हा करण्याच्या उद्देशाने महागांव रोड बायपास उमरखेड येथे थांबुन आहे. अशी विश्वसनीय खबर प्राप्त झाले वरुन पथकाने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळ गाठुन माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेत असतांना उमरखेड येथील महागांव रोड बायपास परिसरात माहिती प्रमाणे संशयीत आढळुन आल्याने त्यास पो.स्टाफ चे मदतीने ताब्यात घेवुन त्याचे नांव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव शेख हुसेन उर्फ शारुख शेख फतरु वय ३० वर्षे, रा. नांदेड रोड, उमरखेड असे सांगीतल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात एक धार धार तलवार किमंत २५००/- रु ची मिळुन आल्याने जप्त करुन नमुद आरोपी शेख हुसेन उर्फ शारुख शेख फतरु याचे विरुध्द पो.स्टे. उमरखेड येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन नमुद आरोपी हा पो.स्टे. उमरखेड येथील गंभीर दुखापतीचे गुन्हयातील फरार आरोपी असल्याने त्यास पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही ही डॉ. श्री. पवन बन्सोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ, श्री. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, श्री. आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ यांचे मार्गदर्शनात, सपोनि गजानन गजभारे, सपोनि अमोल सांगळे, चापोउपनि रेवन जागृत, पोलीस अंमलदार, सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुनिल पंडागळे, सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!