गोपिकाबाई सिताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालयाची गगनभरारी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड ( दि.५ मे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे द्वारे घेण्यात आलेल्या एच एस सी परीक्षा 2025 मध्ये गावंडे महाविद्यालयाचा कला , विज्ञान व वाणिज्य या तीनही शाखेचा उत्कृष्ट निकाल लागला आहे. यवतमाळ जिल्ह्यातिल उमरखेड हे ग्रामीण भागातील एक नामवंत महाविद्यालय असून अमरावती विभागा मध्ये विद्यार्थी संख्येच्या दृष्टीने नंबर दोन वर असले ले हे महाविद्यालय आहे.
दर वर्षी प्रमाणे या ही वर्षी महाविद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवीत घनघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेचा १०० टक्के कला शाखेचा ९९ टक्के तर वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला आहे.
कला शाखेतील शिंदे निरंजन गणेश या विद्यार्थां ने ९०.३३ टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळवीला तर
विज्ञान शाखेत कु. गायत्री विलासराव भोयर या विद्यार्थीनीने ८५.३३ टक्के घेवून विज्ञान शाखेत पहिली आली.
तर वाणिज्य शाखेतील कु. साक्षी उल्हास लव्हेकर या विद्यार्थीनीने ८८.७० टक्के गुण मिळवित वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक मिळविला.
उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या शाखेचा एकूण निकाल ९७ . १४ लागला आहे
कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेमध्ये एकून ३४८ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते.३४८ उतीर्ण झाले. एकूण १०० टक्के निकाल लागला आहे. कला शाखेतून २८५ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते त्या पैकी २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण ९९ टक्के निकाल लागला तर वाणिज्य शाखेतून ४३ विद्यार्थी परिक्षेस प्रविष्ठ झाले होते ४३ सही विद्यार्थी उत्तीर्ण झाले, एकूण १०० टक्के निकाल लागला आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाचा उत्कृष्ट निकाला बाबत संस्थेचे अध्यक्ष मा. राम देवसरकर. संस्थेचे सचिव डॉ. यादवरावजी राऊत साहेब तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी
महाविद्यालयीन सर्व प्राध्यापक. प्रशासकिय कर्मचारी यांचे अभिनंदन केले.