सुकळी जहागीर येथील उपसरपंच यांचा गैर व्यवहार आला चव्हाट्यावर

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
सुकळी ज.येथील सरपंच प्रणाली
मस्के यांच्या नावाने असलेली डिजिटल साईन उपसरपंच शिवाजी रावते यांनी स्वतःच्या मोबाइलला जोडली. उमरखेड ग्रामपंचायतीला कार्यरत असलेले ग्रामसेवक दीपक भगत यांच्यासोबत संगणमत करून व सरपंचाची बनावट सही करून बँके तून पैसे काढले. या प्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला. तालुक्यातील सुकळी (जं) येथील 2023 -2024 या वर्षात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत एसटी प्रवर्गातून महिला सरपंच म्हणून प्रणाली मस्के यांची निवड झाली. पदभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराच्या खात्यात नियमानुसार बदल झाला. सरपंच प्रणाली मस्के यांना डिजिटल सिग्नेचर (डीएसी) सुद्धा मिळाला. सदरच्या डीएसीला उपसरपंच शिवाजी रावते यांनी आपला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला व येथील ग्रामसेवक दीपक भगत यांच्यासोबत संगणमत करून ग्रामपंचायत स्तरावर ग्रामविकासासाठी आलेला निधी उपसरपंच शिवाजी रावते याने स्वतःच्या मोबाइलवर ओटीपी घेऊन परस्पर काढून घेतला. तसेच घरकूल लाभार्थ्यांच्या फाइलवर सरपंच यांच्या बनावट सह्या मारल्या व तसेच महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये सरपंचाच्या बनावट सह्या करून भ्रष्टाचार केला. हा घडलेला सर्व प्रकार सुकळी ग्रामपंचायतचे सदस्य ज्ञानेश्वर कनवाळे, अरविंद बडेराव व राहुल वानखेडे यांनी सरपंच मस्के यांच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे सरपंच प्रणाली मस्के यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी निवेदन देऊन या बाबत संपूर्ण माहिती दिली. बनावट सह्या करून भ्रष्टाचार केल्यामुळे शासनाची फसवणूक झाली असून याबाबतीत सखोल चौकशी करून संबंधितावर कार्यवाहीकरण्यात यावी, यासाठी 3 जुलै 2024 जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी मनरेगा यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या, उपसरपंच शिवाजी रावते यांची पत्नी रंजना रावते यांच्या नावे घरकूल योजनेचा लाभही माझ्या बनावट सहीने घेऊन त्या पोटी संगणमताने दोन हप्ते उचलले. ही हप्त्याची रक्कम उचलण्यासाठी जिओ ट्रेकिंग अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी हाताशी धरून बनावट सह्यांचे आधारे शासन निधी हडपविला, असल्याचा आरोपही महिला सरपंचाने केला आहे. संगणमताने झालेल्या या प्रकारासंबंधी सुकळी (जं) येथील सरपंचाने थेट उपसरपंच शिवाजी रावते, ग्रामसेवक दीपक भगत व उपसरपंच यांच्या पत्नी रंजना रावते यांच्या विरोधात उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाने संबंध तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
--- चौकट ---
सदर प्रकरणी तक्रार मिळाली आहे. तपास सुरू असून हे प्रकरण आर्थिक गुन्हे
संबंधित असल्यामुळे पूर्ण तपास करू. तसेच प्रकरणाचा तपशील वरिष्ठांकडे परवानगीसाठी लवकरच पाठवण्यात येणार असून वरिष्ठांची परवानगी मिळताच याबाबत गुन्हे दाखल करण्यात येतील.
संजय सोळंके, ठाणेदार उमरखेड
चौकट
शिवाजी रावते हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर या पूर्वी उपविभागीय अधिकारी उमरखेड यांची खोटी स्वाक्षरी मारून बोगस जात प्रमाणपत्र दिल्या बद्दल,प्रकरण न्यायालयीन आहे.त्यामुळे या गुन्हेगारावर त्वरित कार्यवाही करण्यात यावी.
सौ.प्रणाली रवी मस्के
सरपंच सुकळी(ज)