तृतीयपंथी हायवेवर लोकांना घाबरवून उकळत आहेत जबरस्तीने पैसे

शेख इरफान
सहसंपादक मो.7798306192
नांदेड : हदगाव तालुक्यातील गोजेगाव गावाजवळ पैनगंगा नदीपासून अर्ध्या किलोमीटरवर रुद्राजी पाटलाच्या ढाब्याजवळ 10 ते 12 तृतीयपंथी हायवेवरील चारचाकी व दुचाकींना अडवून त्यांच्या वाहनांचा पाठलाग करून प्रवाशांकडून जबरदस्तीने रोज पैसे वसूल करीत आहेत
त्यामुळे या महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे, जबरदस्तीने अचानक वाहन अडवत असल्याने वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे,जोपर्यंत प्रवाशी त्यांना पैसे देत नाहीत तोपर्यंत एकही दुचाकी व चारचाकी वाहन हे तृतीयपंथी तेथून हलूचं देत नाहीत
हायवे पोलीस,आणि स्थानिक ट्राफिक पोलिसांनी तात्काळ या गंभीर बाबीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे,प्रवाशी स्वइच्छेने तृतीयपंथी लोकांना पैसे देतातच परंतु अचानक वाहनांची अडवणूक करून प्रत्येक वाहनाला अडविल्यामुळे ट्राफिक जाम होऊन भीषण अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही,त्या स्थळी हायवेच्या काम चालू असल्याने रस्ता अरुंद गड्डेयुक्त असल्याने अचानक या लोकांनी सर्वच वाहन अडविल्याने
वाहन एकमेकांना धडक दिल्याचे प्रकारही येथे घडत असल्याचे अनेक वाहनचालक व प्रवाश्यांनी सांगितले आहे
तुम्हाला दररोज षंढांचा सामना होत असेल. हे नपुंसक ट्रेनमध्ये किंवा रस्त्यावर लोकांकडून पैसे गोळा करताना दिसतात. एखाद्या षंढाने तुम्हाला शाप दिल्यास तुमचे जीवन नरक होईल, असेही लोकांच्या मनात रुजले आहे. या भीतीमुळे लोकही षंढांशी वाद घालत नाहीत. पण याचा फायदा अनेक वाईट लोक घेतात. अनेक पुरुष नपुंसक म्हणून वेश धारण करतात आणि लोकांकडून पैसे उकळतात. राजस्थानमधील बिकानेर येथून नुकतेच असेच एक प्रकरण समोर आले आहे. जिथे दोन नकली नपुंसक खऱ्या नपुंसकांनी पकडले. यानंतर काय झाले याची कल्पनाही कोणी केली नव्हती.