Uncategorized

आमदार नामदेव राव ससाने यांच्या हस्ते आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाचे वारसाना तात्काळ मदत

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड:- दि२६ (उमाका) आत्महत्या ग्रस्त शेतका-याच्या वारसाना आ. नामदेवराव ससाने यांचा हस्ते धनादेश देऊन तत्काल मददत करण्यात आली.शेतकरी आत्महत्या कुटुंबांना आमदाराच्या हस्ते धनादेश वाटप उमरखेड तालुक्यातील टेंभुरदरा व नारळी येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार नामदेव ससाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . तालुक्यातील टेंभुरदरा येथील भिकू जाधव व नारळी येथील संतोष मखळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या सदर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदत म्हणून शासनातर्फे प्रत्येकी एक लाख रुपयेमदत जाहीर झाली होती त्यानुसार आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आमदार नामदेव ससाने तहसिलदार आर यु सुरडकर नायब तहसीलदार वैभव पवार एम एस तिडके नागेश अईनवाड यांच्या उपस्थितीत सीमा भिकू जाधव व अश्विनी संतोष मखळे या शेतकरी कुटुंबाच्या वारसांना तीस हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले उर्वरित 70 हजार रुपयांचे धनादेश मृतकाचे वारसाचे व तहसीलदार उमरखेड यांचे नावे पोस्ट ऑफिस येथे संयुक्त खाते उघडून सदर रक्कम सहा वर्षा करिता गुंतवण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!