Uncategorized

अज्ञात वाहानाच्या धडकेतएकाचा मुरत्यु

हदगाव प्रतीनिधी
बालाजी पाटील

नांदेड नागपूर या

महामार्गावर हदगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मानवाडी येथील जागृत हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन परतताना अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दिलीपराव किशन कोल्हे वय ६० यांना डोक्यास जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हदगाव शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर हनुमान मंदिर येथे दर्शन घेऊन परत येतांना सायंकाळी ७ सुमारास श्री दत्त कला व वाणिज्य महाविद्यालय येथील सेवानिवृत्ती कार्यालय अधीक्षक दिलीपराव किशन कोल्हे यांच्या दुचाकीस वेंकटरमना इंग्लिश मिडीयम स्कूल अंबाळा येथे वडकुते पेट्रोल पंपा समोर अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली महामार्गवरील १०३३ या रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय हदगाव येथे तातडीने आणण्यात आले. प्राथमिक तपासणी केल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले असून त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!