Uncategorized

उमरखेड येथे ब्राह्मण समाजाचा उप वधु वर परिचय मेळावा संपन्न

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :
परशुराम संस्कार सेवा संघातर्फे दि.१६ मार्च २०२५ रोजी ब्राम्हण समाजाचा उप वधू वर मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अनिल करोडकर व तसेच परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष संतोष देव हे मंचावर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे परशुराम सेवा संघ संस्थापक अध्यक्ष बीड गजाननराव जोशी, अजय बेदरकर,अँड. सावित्रीजी जोशी, विनोद कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळेस उप वधू वर परिचय मेळाव्याचे पुस्तकाचे विमोचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळेस व्यासपीठावरून बोलतानां अँड सावित्रीजी जोशी यांनी मुलींना आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवून होतकरू व निर्व्यसनी मुलांना प्राधान्य द्यावे अशा सूचना दिल्या या वधू वर परीचय मेळाव्याला उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत आयाचित सर व सौ. प्रणाली प्रशांत पांडे यांनी तर वधु वरचा परिचय सौ.रोहिणी बाळासाहेब देशपांडे यांनी दिला. प्रास्ताविक सौ. मंजुषा सुनील वान्नरे यांनी केली. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भारतराव कुलकर्णी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्रीपाद देव, कांतराव पांडे, पत्रकार स्वप्नील मगरे ,रवी कुमार देव सुनील देशपांडे, सुधीर पोटे, दामोधर भानेगावकर सर, माधव देशमुख, विष्णुपंत पाध्ये, एमडी पांडे, विजय पाध्ये, राजाभाऊ चुरमुरकर चंद्रकांत भानेगावकर सुनील वान्नरे , रवी कुमार वान्नरे इ.सर्व परशुराम सेवा संघा कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली या मेळाव्यास महाराष्ट्रातील सर्व भागातून लोकांनी आपला सहभाग नोंदविला व स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल परशुराम सेवा संघाचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!