आर्णी तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे तात्काळ बंद करा

(वादग्रस्त पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांच्या संपत्तीची खाते निहाय चौकशी करावी – युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत मडावी यांनी केली पत्राद्वारे मागणी)
सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466
आर्णी :- (दि. 12 जानेवारी) तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावलेले आहेत.
जसे मटका, जुगार, गुटका,देशी दारू, गावठी दारू आणि रेती तस्करी या धंद्याला उत आला असून वादग्रस्त पोलीस निरीक्षक केशव ठाकरे या अवैध धंद्यातुन संपत्ती गोळा केलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुका हा अवैध धंद्याचे केंद्र बनले आहे.
केशव ठाकरे पोलीस निरीक्षक यांची ३ महिन्या पुर्वी त्यांची नियुक्ती झाली होती आर्णी ला रुजू झाल्या पासून मोठ्या प्रमाणात अवैध धंदे व गुन्हेगारी वाढली आहे.
उदा. जुगार,मटका, गुटका मोठ्या प्रमाणात अवैध दारू,रेती तस्करी इत्यादी अवैध्य धंद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पोलीस निरीक्षक केशव ठाकरे आर्णीला रुजू झाल्या पासून सगळे अवैध्य धंदे फोफावले आहे हे अवैद्य धंदे बंद होणार…! तरी कधी असा प्रश्न सामान्य जनतेत निर्माण झाला आहे.
पोलीस निरीक्षक ठाकरे आर्णी ला आल्यापासून करोडोंची संपत्ती गोळा केली आहे त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची खाते निहाय चौकशी व्हावी.
केशव ठाकरे ठाणेदार यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकते अशा वादग्रस्त ठाणेदाराची तात्काळ बदली करण्यात यावी त्यामुळे अवैध धंद्याला आळा बसू शकेल या पत्राची गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी.
अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत मडावी यांनी केली आहे.