Uncategorized

हुडी बुद्रुक येथील भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचासह ग्रामसेविकेला केली अटक

वाशिम च्या तुरुंगात रवानगी

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

पुसद – तालुक्यातील हुडी बु.ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सरपंच व ग्रामसेविका यांनी संगणमत करून तब्बल १४ लाख९१ हजार २३८ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. दोघींनीही भ्रष्टाचार केल्याप्रकरणी माजी सरपंचांनी संबंधित कार्यालयात त्या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या होत्या. कारवाई होत नसल्याने उपोषण देखील केले होते.जवळपास दोन वर्षाच्या चौकशीनंतर ग्रामीण पोलिसांनी सरपंच व ग्रामसेविकेला अटक केले आहे.दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या महिला सरपंच व ग्रामसेविकेची वाशिमच्या कारागृहात रवानगी देखील केली आहे.
सरपंच अनुराधा शिवानंद कान्हेकर व ग्रामसेविका अनिता दिगंबर आगाशे असे भ्रष्टाचार करणाऱ्या करणाऱ्यांची नावे असून त्यांच्या विरोधामध्ये माजी सरपंच संतोष धरणे यांनी गटविकास अधिकारी यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या.माजी सरपंच संतोष दरने यांनी दि.२८ मार्च २०२२ पासून आठ दिवस ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुद्धा केले होते.सरपंच व ग्रामसेविकेने हुडी बु. ग्रामपंचायतमध्ये सन २०१८-२०१९ मध्ये दलित वस्ती, तंटामुक्त मुक्त गाव,पाणीपुरवठा निधी,स्वच्छ भारत मिशन या योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे.तत्कालीन ग्रामसेविका व सरपंचसह सदस्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी माजी सरपंच संतोष धरणे यांनी तक्रारीत केली होती. सरपंच व ग्रामसेविकेने १४ लाख ९१ हजार २३८ रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी अंती सिद्ध झाल्याने दोघींनाही ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू व बीट जमादार इंदल आडे यांनी अटक केले आहे. भ्रष्टाचार करणाऱ्या सरपंचासह ग्रामसेविकेला अटक झाल्याने भ्रष्टाचार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!