महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या राज्य कार्यकारी मंडळाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी किरण मुक्कावार यांची निवड

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेची त्रिवार्षिक आमसभा नांदेड येथील वासवी भवन येथे संपन्न झाली असून या नवीन राज्य कार्यकारी मंडळामध्ये उमरखेड येथील रहिवाशी तसेच सुदर्शन न्युज चैनल चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी किरण मुक्कावार यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या राज्य कार्यकारिणी मंडळावर प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वांनी कौतुक केले आहे. किरण मुक्कावार हे मागील पंधरा वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात असून त्यांनी जनतेला व तसेच समाजातील अनेक समाज बांधवांना न्याय मिळवून दिला आहे याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, कार्याध्यक्ष भानुदास वट्टमवार व महासचिव गोविंद बिडवई यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्य वैश्य महासभेच्या कार्यकारी मंडळात राज्याचा प्रसिद्धीप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.