Uncategorized

शॉर्टसर्किटमुळे घराला आग

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड :- पिंपळदरी येथ एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच अन्नधान्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 सुमारास घडली. या घटननेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत वृत्त असे, की पिंपळदरी गावातील सखाराम कबले यांच्या घरात सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरातून मोठा धूर निघत असल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले.
काही वेळातच घरात आग लागल्याचे समजताच एकच धावपळ उडाली. घरात आग लागली त्यावेळी घरमालक बाहेर होते. आग लागल्याचे शेजारांच्या लक्षात येताच त्यांनी घरात प्रवेश करून आग विझवली मात्र,तोपर्यंत संपूर्ण घरातील साहित्याचा अक्षरशः कोळसा झाला होता.
गावातील तरुणांनी वेळीच प्रसंगावधान दाखवत घरातील वीजपुरवठा खंडीत करून पेट घेतलेली एल,इ डी बाहेर काढली,धूर ओसरल्यावर घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून आले.अचानक लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्यासह अन्नधान्य ,महत्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले यामुळे घरमालक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे,

तलाठी यांनी केला घटनेचा पंचनामा-:
पिंपळदरी येथील तलाठी शेख यांनी घटनेची माहिती मिळाल्या नंतर घटनास्थळी दाखल होऊन घरातील जळालेल्या साहित्य, तसेच अन्नधान्य याचा पंचनामा करून तहसील कार्यालयात सादर केला आहे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!