Uncategorized

होमगार्ड सैनिकांना बारा महिन्याकरिता कामावर घ्या!महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड दि. 22/02/2025 रोजी उमरखेड येथे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे हे आले असता उमरखेड येथील होमगार्ड सैनिकांनी त्यांना निवेदन सादर केले. त्यांनी आपल्या निवेदनात होमगार्ड हे उत्सव असो किंवा राज्यात वा शहरात तणावकारक परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना बोलविले त्या वेळेत हजर होतात व बंदोबस्तात आपले कर्तव्य बजावतात त्यांना शासनाने 06/12/1947 पासून ही होमगार्ड सैनिक स्वयंसेवक संघटना निर्माण झाली तेव्हापासून कार्य करीत असते शासनाने वेळोवेळी त्यांना GR मध्ये बदल करून देखील ते आपल्या कार्यावर हजर असतात. परंतु त्यांना 12 महिन्यातून 3 ते चार महिनेच काम मिळते त्यामुळे त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण जाते, वेळोवेळी इतरत्र काम शोधावे लागते. तेव्हा त्यांना 12 महिन्याकरिता कामावर घेण्यात यावे असे निवेदन सादर केले यावेळी श्री आठवले,समीर खॉ.,मनीष आडे, अमोल आडे, बी.एम.सिंगणकर, विजय रेशमाजी आठवले यांसह होमगार्ड सैनिक हजर होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!