Uncategorized

भीम आर्मी यवतमाळ जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांची पुसद मध्ये विविध विषयावर पत्रकार परिषद संपन्न

सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

पुसद (दि. 15 डिसेंबर)
भीम आर्मी तथा भारत एकता मिशन सामाजिक संघटनेच्या वतीने दि. 15 डिसेंबर 2023 रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद संपन्न झाली.

सविस्तर वृत्त असे की पुसद तालुका येथे विविध विषयाच्या अनुषंगाने भीम आर्मी सामाजिक संघटनेच्या वतीने शासन स्तरावर विविध विषयाची निवेदने देण्यात आली परंतु दिलेल्या निवेदनावर शासन स्तरावर कोणत्या प्रकारचे कारवाई करण्यात आली नाही. त्या अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेण्याचे मुख्य आयोजन होते.

त्यामध्ये प्रामुख्याने दिनांक 6 डिसेंबर 2023 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी पुसद भाजपाच्या जिल्हा मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष यांच्यावर हेतू पुरसर सूडबुद्धीने कार्यवाही करण्यात आली ती मागे घेण्यात यावी, पुसद शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा.

या दृष्टीने महिला सुरक्षा निर्भया पथक, दामिनी पथक, कार्यान्वित येऊन पोलीस विभागाने ही कारवाई त्वरित करण्यात यावी तसेच पुसद उपविभागीय पोलीस कार्यालय येथे नवनिर्मित दर्शनी कमान यावर भारती मैद पतसंस्थेचे असवैधानिक असलेले नाव मुख्य कमानीवरून त्वरित काढण्यात यावे इत्यादी प्रमुख मागण्यासह भीम आर्मी तथा भारत एकता मिशन यांच्या वतीने पत्रकार परिषदेत विविध विषयाची मागणी करण्यात आली आहे.

तसेच शासकीय कार्यालयातील वाढलेला भ्रष्टाचार, पुसद शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहन व्यवस्था सुरळीत करणे, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे शहर पोलीस स्टेशन तथा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत ॲट्रॉसिटीचे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करणे इत्यादी विषयासह या पत्रकार परिषदेमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

तसेच शासन स्तरावर या प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यात यावा अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात लोकशाही व सनदशीर मार्गाने मोर्चे, आंदोलन,उपोषण करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी असेही शेवटी आयोजक भीम आर्मी जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला मुख्य आयोजक, भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, वंचित आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, डॉ.अरुण राऊत,सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कांबळे,भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे, रिपब्लिकन वार्ता न्यूजचे विदर्भ उपपसंपादक राजेश ढोले इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!