श्री. जगदिशभाऊ नरवाडे, संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती यांच्या नेतृत्वात

आम आदमी पक्षाचा जन आंदोलन आधार समितीला जाहीर पाठिंबा
मोर्चात खालील लोकहितांच्या गंभीर मागण्या अतिवृष्टी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीची व दुकानेदारीची मालभर पायी सरकारने करून द्यावी गोडाऊन दुकानांमध्ये पाणी गेल्याने शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान झाले. पिक विमा व काही लोकांना अत्यंत अल्प स्वरूपाची मदत मिळाली तर बहुतांश लोकांना आजपर्यंत पदरी दमडी ही आली नाही असे लोक मोर्चामध्ये सामील झाले वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे विजेच्या लपंडावाने विद्यार्थी नागरिक व शेतकरी त्रस्त आहेत येणारे दिवस हे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे असल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे त्यांचे नियोजन करणे यांना कठीण दिसत आहे त्यामुळे समक्ष अधिकारी तात्काळ कामाला द्या. दहा शेतकऱ्यामागे एक डीपी देऊन विज वितरण दिवसा करा. कर्जमाफीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बँकांतील घोळ अजून मिटला नाही त्यामुळे बँकेत पुन्हा कर्ज मिळत नाही घोळ असलेल्या शेतकऱ्यांचा व बँकेत सतत शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान खात्यात जमा झाले नाही त्यांचा अर्ज अधिकाऱ्यांना भरून देण्यात आला महागाव तालुक्यात अनेक गावात दारूचा महापूर आलेला आहे त्यामुळे लहान बालके व्यसनाधीन होत आहेत तीन वर्षापासून महागाव तालुका हा प्रभारावर असल्यामुळे पैसे घेतल्याशिवाय कोणत्याही कार्यालयामध्ये काम होत नाही सर्व प्रभारी पदे तात्काळ भरण्यात यावेत महागाव ग्रामीण रुग्णालयाची पद भरती गेल्या सात वर्षापासून खंडित आहे ती भरती करून रुग्णालय तात्काळ चालू करण्यात यावे महागाव सरकारी रुग्णालयातून वैद्या मार्फत पाठवलेले लोक प्रवासात दगावणार नाही याची काळजी घ्यावी महागाव नगरपंचायत अंतर्गत मागील चार वर्षापासून घरकुलांचे हप्ते थकीत आहेत त्यासंबंधी तात्काळ प्रक्रिया करण्यात यावी व निधी घरकुल लाभार्थ्यांना लवकरच मिळावा याकरिता पंचायत समिती कार्यालय महागाव ते तहसील कार्यालय महागाव मोर्चा काढण्यात आला व यावेळी आम आदमी पक्षाच्या शहर कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहराध्यक्ष आम आदमी पार्टी विवेक राजेंद्र नरवाडे शहर उपाध्यक्ष दीपक तुकाराम तायवाडे शहर उपाध्यक्ष संतोष प्रल्हाद खंदारे शहर उपाध्यक्ष आकाश अशोक मुखाडे शहर उपाध्यक्ष अमोल संतोबा पवार अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष अरबाज शब्बीर शेख अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष अभिजीत भागोराव बहादुरे युवा आघाडी अध्यक्ष इरशाद शेख क्रीडा अध्यक्ष आम आदमी पार्टी रतीश देवानंद सांगडे इत्यादी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते