Uncategorized
संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी

मुंबई प्रतिनीधी: महेश कदम
चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष श्री . मयुर कांबळे यांच्या मार्फत प्रभादेवी येथील संत रोहिदास महाराज चौक येथे मोठ्या उत्साहात संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांनी ई.स. पुर्व काळात समाजात जातीनिहाय व्यवस्थेमुळे निर्माण होणारी तेढ कमी करुन समानतेचा संदेश दिला. त्यांचे दोहे प्रसिद्ध असून आजही सर्वाना दिशादर्शक ठरत आहेत. या ठिकाणी चर्मकार समाजासाठी कार्य करण्याऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मयुर कांबळे, भास्कर गद्रे, सुदामा गायकवाड, महेश यादव यांच्यासह चर्मोद्योग कामगार सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.